बातम्या

आपत्ती व्यवस्थापन जनजागृती साठी मिनी मॅरेथॉन चे आयोजन

Organized mini marathon for disaster management awareness


By nisha patil - 8/8/2024 5:59:45 PM
Share This News:



राज्य शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर यांचे मार्फत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन विषयीची जनजागृती करण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 07.00 वाजता मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलय. या मिनी मॅरेथॉनचा रन जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथून सकाळी 07.00 वाजता सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयापासून धैर्यप्रसाद मंगल कार्यालय चौकापर्यंत जाऊन परत जिल्हाधिकारी कार्यालय अशा पद्धतीने  2.5 किलोमीटर अंतराचा असणार आहे. 

या मिनी मॅरेथॉन मध्ये कोल्हापूर शहरातील एनसीसी, एनएसएस मध्ये कार्यरत असणारे महाविद्यालयीन युवक युवती यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


आपत्ती व्यवस्थापन जनजागृती साठी मिनी मॅरेथॉन चे आयोजन