बातम्या
विवेकानंद मध्ये सुक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन
By nisha patil - 1/3/2024 4:59:52 PM
Share This News:
कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेजमध्ये विज्ञान दिनाचे औचित्य साधून सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 24.02.2024 ते 28.02.2024 या कालावधीत सायन्स् वीक साजरा करण्यात आला. या अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयातील गणित विभागप्रमुख प्रा. एस. पी. थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध कलाकृतीतून विषयाची मांडणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विभागातर्फे मायक्रोटून, निबंधलेखन, स्लोगन, पोस्ट्रर प्रेझेंटेशन, मॉडेल मेकींग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्याशाखेचे अधिविभागप्रमुख डॉ.ए.एस.कुंभार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सायन्स् वीक ची सांगता करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्रा.कु.व्ही.व्ही.मिसाळ, प्रा एस डी गबाले, प्रा कु एस ए पिसे, प्रा कु ए ए जाधव, प्रा कु एन आर जाधव प्रशासकीय कर्मचारी श्री एस पी माळी, श्री एस के मस्क्र
यांनी केले. कार्यक्रम संयोजनासाठी प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार व विभागप्रमुख डॉ.जी.के.सोनटक्के यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विवेकानंद मध्ये सुक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन
|