बातम्या
अशोकराव माने इन्स्टिट्यूटमध्ये युवा संवाद मेळाव्याचे आयोजन
By nisha patil - 5/5/2024 4:46:21 PM
Share This News:
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी वाठार गावातील अशोकराव माने इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद मेळाव्यात उपस्थित युवक युवतींना संबोधित केले, तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे कायमच देशातील युवा वर्गाचा विचार करून आपली ध्येयधोरणे आखतात, त्यांच्या मार्गदर्शन यानुसार वाटचाल करणारे सरकार आहे. तुमच्यातील अनेक जण यंदा पहिल्यांदा मतदान करणार असतील, मतदान करताना देशाला प्रगतीकडे नेणाऱ्या नेतृत्वाची निवड करा असे आवाहन या तरुण मित्रांना केले.
देशात आज विविध क्षेत्रात अनेक सुधारणा होत आहेत. रस्ते, रेल्वे मार्ग, नवनवीन उद्योग, स्टार्टअपला प्रोत्साहन देणारे धोरण अंगिकारल्यामुळे अनेक नवनवीन संधी खुल्या होत आहेत. या संधीचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा आणि नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
माणसाच्या आयुष्यात शिक्षणाला फार महत्त्व आहे. मी स्वतः मंत्री झाल्यावर बीए पूर्ण केले आणि एमए पार्ट वन पूर्ण करत असतानाच आम्हाला सत्ता परिवर्तन घडवून तुमच्या मनातले सरकार आणावे लागले. मात्र माझे अर्धवट शिक्षण मी नक्की पूर्ण करणार असल्याचे यासमयी आवर्जून सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना, कोल्हापूर हा प्रगत भाग असून येथे फार्मा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा नक्की प्रयत्न शासन करेल. एमआयडीसीमध्ये फार्मा क्षेत्रातील कंपन्या नक्की आणल्या जातील. उद्योग पूरक धोरण राबवले जाईल. विद्यार्थिनींप्रमाणे विद्यार्थ्यांना एसटी प्रवास मोफत करणे शक्य होईल का याबाबत नक्की सकारात्मक निर्णय घेऊ असेही याप्रसंगी स्पष्ट केले.
यावेळी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने, शिवसेनेचे समन्वयक उदय सावंत तसेच अशोकराव माने इन्स्टिट्यूटचे संचालक, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोकराव माने इन्स्टिट्यूटमध्ये युवा संवाद मेळाव्याचे आयोजन
|