बातम्या
युवकांची संघटीत शक्ती भारताला जागतिक महासत्ता बनवेल :राजेश क्षीरसागर
By nisha patil - 5/8/2024 2:53:28 PM
Share This News:
प्रत्येक देश हा युवकांनी समृद्ध बनत असतो. युवा शक्ती जर योग्य दिशेने प्रवाहित झाली तर देश प्रगतीपथावर अग्रेसर होत असतो. तरुणांचा देश म्हणून ओळख असणाऱ्या भारत देशाला जागतिक महासत्ता बनविण्यात तरून वर्गाला महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे.
त्यामुळे निर्व्यसनी आणि भ्रष्टाचार मुक्त भारताची बीजे युवा पिढीतून रोवली जाणे गरजेचे असून, देशसेवेसाठी आणि देशाला जागतिक महासत्ता बनविण्याच्या हेतूने युवा पिढीने मोलाचे योगदान द्यावे. गत वर्षी देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत @२०४७ याद्वारे सन २०४७ पर्यंत देशाला जागतिक महासत्ता बनविण्याचा संकल्प केला असून, याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
मित्रा संस्थेच्या माध्यमातून युवा पिढीच्या सक्षमीकरणाकडे भर देण्यात येत असून, युवकांची संघटीत शक्ती भारताला जागतिक महासत्ता बनवेल, अशा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. युवा सेना आणि नो मर्सी ग्रुपच्या वतीने मैत्री दिनानिमित्त "राजेश युथ फेस्टिव्हल" चे मेरी वेदर ग्राउंड येथे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
युवकांची संघटीत शक्ती भारताला जागतिक महासत्ता बनवेल :राजेश क्षीरसागर
|