इचलकरंजी महापालिकेच्या वतीने 'रमाई आवास' योजनेंतर्गत विशेष मोहिमचे आयोजन
By nisha patil -
Share This News:
इचलकरंजी : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमाच्या माध्यमातून योजना जन कल्याणकारी ,सर्वसामान्यांच्या दारी हे ब्रीदवाक्य अंगीकारुन शासनाच्या सर्व विभागांच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचाव्यात आणि त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमाच्या अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात विविध ठिकाणी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजनेंतर्गत गुरुवार दिनांक १८ मे व शुक्रवार दिनांक १९ मे रोजी विशेष मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेत इचलकरंजी शहरातील विविध ठिकाणी अति.आयुक्त डॉ प्रदीप ठेंगल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी अभियंता संजय बागडे ,शहर अभियंता भागवत सांगोलकर यांच्या नियंत्रणाखाली सिद्धार्थ हौसिंग सोसायटी, महात्मा गांधी हौसिंग सोसायटी, कामगार चाळ ,वार्ड क्रमांक १९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कोल्हापूर रोड , इंदिरानगर, शांतीनगर, लाखे नगर , जयभीम नगर वसाहत ,
वार्ड क्रमांक ११ नेहरूनगर परिसर ,
वार्ड क्रमांक ७ लाल नगर परिसर , वार्ड क्रमांक १ टाकवडे वेस परिसर , वार्ड क्रमांक २२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर / डेक्कन जवळ व वार्ड क्रमांक २२ गणेशनगर गल्ली नंबर १ ते ९ ,
शहापूर बौद्ध समाज मंदिर परिसर , वार्ड क्रमांक ९ साईट नंबर १०२ परिसर व आसरा नगर परिसर अशा १०ठिकाणी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत.या मोहिमेत शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजनेतर्गत या घटकातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांना किंवा
कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा , या हेतूने प्रत्यक्ष लाभार्थी राहत असलेल्या परिसरात सदर योजनेची माहिती देणे, घरटी सर्वेक्षण करुन पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेणे इत्यादी कामे करण्यात येत आहेत.आज गुरुवार दिनांक १८ मे
रोजी मोहीमच्या पहिल्या दिवशी एकूण १४५ लाभार्थ्यांंचे अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्या शुक्रवार दिनांक १९ मे रोजीसुद्धा सदर मोहीम सुरू राहणार आहे.तरी या योजनेच्या इच्छूक लाभार्थ्यांनी या मोहिमचा लाभ घ्यावा , असे आवाहन महानगरपालिका उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी केले आहे.
इचलकरंजी महापालिकेच्या वतीने 'रमाई आवास' योजनेंतर्गत विशेष मोहिमचे आयोजन
|