बातम्या

जोतिर्लिंग मंदिर वास्तूशांती, प्राणप्रतिष्ठापना निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

Organizing various religious programs on the occasion of Jotirlinga Temple Vastushanti


By nisha patil - 6/9/2023 5:50:16 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी  येथील तांबे माळ परिसरात श्री जोतिर्लिंग मंदिराची वास्तूशांती व प्राण प्रतिष्ठापनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे कार्यक्रम हे रविवार दि. १० सप्टेंबर ते मंगळवार दि. १२ सप्टेंबर असे तीन दिवस चालणार असल्याची माहिती जोतिर्लिंग भक्तगण मंडळाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाव्दारे देण्यात आली आहे.

यामध्ये रविवार दि. १० सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता 'श्री'च्या मूर्तीची मिरवणूक, सकाळी ९ वाजता महा संकल्प, गणेशपूजन, पुण्याहवाचन, ब्राम्हादी मंडल देवता स्थापन, सकाळी १० वाजता जलाधि वास, धान्यादिवास, शय्या धार्मिक विधी. सोमवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ८.१५. वाजता वास्तू मंडल स्थापन , नवग्रह स्थापन, होमहवन व सकाळी ११.३० वाजता कणेरीच्या सिद्धगिरी मठाचे प.पू. चिदानंद स्वामी यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, दुपारी १२.३० वाजता महाआरती कार्यक्रम तसेच मंगळवार दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते भाविकांना महाप्रसाद वाटप कार्यक्रम होणार आहे. तरी या धार्मिक कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जोतिर्लिंग भक्त मंडळ, मंदिर उभारणी कार्यकारिणी सदस्य व मंदिराचे पुजारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.


जोतिर्लिंग मंदिर वास्तूशांती, प्राणप्रतिष्ठापना निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन