बातम्या
अन्यथा मराठा समाज भुजबळांना रस्त्यावर फिरून देणार नाही - राजेश क्षीरसागर
By neeta - 1/27/2024 6:06:16 PM
Share This News:
कोल्हापूर : गेले पाच महिन्यापासूनचा मराठा समाज लढत असलेला लढा अखेर पूर्ण झाला. शासनाने शासकीय अध्यादेश काढत मराठ्यांच्या सरसकट मागण्या पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आज राज्यात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्यनियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाकेबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी केली . राजेश क्षीरसागर यांनी स्वतःच्या हाताने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना साखर पेढे वाटत आनंद उस्तव साजरा केला. यावेळी राज्यनियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर चांगलाच निशाणा साधत असल्याचं पाहायला मिळालं
क्षीरसागर पत्रकारांशी संवाद साधत होते, यावेळी पत्रकारांनी छगन भुजबळ यांच्यावर काही प्रश्न विचारले असता त्यावर क्षीरसागर म्हणाले, की. भुजबळांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्यावेळी शासन कोणतीही घोषणा करत असते त्यावेळी इतर कोणताही समाजाला धक्का न लावता आरक्षण देत आहे. त्यावेळी तुम्ही एक मंत्रिमंडळाचे सहकारी आहात.
तुम्ही अशा प्रमाणे मराठा समाजाविरुद्ध बोलता कामा नये. अन्यथा मराठा समाज तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही असा दम राजेश क्षीरसागर यांनी छगन भुजबळ यांना दिला.
पुढे क्षीरसागर म्हणाले, शासनाने जो निर्णय घेतलाय त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व समाजासाठी सर्वसमावेशक काम करणारी व्यक्ती आहेत. दसरा मेळाव्यात त्यांनी जाहीर केले होते इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात येईल, त्यातील पहिला टप्पा मराठा आरक्षणासाठी आज दिलेला त्यांचा ऐतिहासिक निर्णय आहे. त्यामुळे भुजबळ आणि इतर समाजाला उचकटण्याचा काम करू नये असा कडक इशारा राजेश क्षीरसागर यांनी छगन भुजबळ यांना यावेळी दिला
मनोज जरागेंच्या कडक इशारानंतर रात्रीत काठले अध्यादेश
आज रात्रीपर्यंत मराठा आरक्षणाबाबतीत आदेश काढावा. अन्यथा, 27 जानेवारी दुपारी बारानंतर आझाद मैदानाकडे कूच करू असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलकांचा ताफा वाशी, नवी मुंबईत या ठिकाणी थांबला होता. त्यानंतर राज्य सरकारने अध्यादेश मध्यरात्री काढल्यानंतर आझाद मैदानाकडील प्रवास थांबवला आणि आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.
अन्यथा मराठा समाज भुजबळांना रस्त्यावर फिरून देणार नाही - राजेश क्षीरसागर
|