बातम्या

अन्यथा 26 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार

Otherwise they will protest in front of the guardian ministers residence on January 26


By nisha patil - 12/30/2023 7:56:30 PM
Share This News:



अन्यथा 26 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार 

आज अंकुश संघटनेच्या वतीने आज कोल्हापूर मध्यवर्ती बँक येथे आंदोलकांची बैठक

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्यातील सर्व शेतकऱ्यांनी  आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या दारात तीव्र आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं .जिल्ह्यातील ३३ हजार शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नाही. यामुळे आज अंकुश संघटनेच्या वतीने आज कोल्हापूर जिल्हा बँक येथे आंदोलक जमले होते. यावेळी त्यांनी पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. जर सरकारने वेळीच अनुदान जमा केले नाही तर ३३ हजार शेतकरी २६ जानेवारी रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येणार असल्याचे धनाजी चिडमुंगे यांनी सांगितले
   

2019 ची ही महात्मा फुले कर्जमुक्ती योजना  हि थकित कर्जदारासाठी राबविली होती पण  थकित कर्जदाराबरोबर प्रामाणिक कर्ज भरणाऱ्यांनी कर्ज भरून चूक केली असे वाटू नये म्हणून प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून 50000अनुदान जाहीर केले होत पण चुकीचे निकष लावून प्रामाणिक शेतकऱ्यांना  अपात्र ठरवल आहे. याला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या दारात आंदोलन केलं यावेळी  जिल्हा बँकेचे चेअरमन व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय हसन सो मुश्रीफ यांनी निवेदन स्वीकारून पुढील आठवड्यात सहकार मंत्रालय मुंबई या ठिकाणी याबाबत बैठक लावून पाठपुरावा करू असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले . 
   

नियमित व मुदतीत पिक कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा केली होती या योजनेचा मूळ हेतू हा शेतकऱ्यांना कर्जाची नियमित फेड करण्यास संस्थान मिळावे म्हणून शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना पन्नास हजार किंवा त्यापेक्षा कमी जितकी उचल असेल तितकीच रक्कम देण्याची घोषित केले होते. 
 

17 ते 2020 या तीन वर्षात किमान दोन वर्ष पीक कर्ज घेऊन ते मदतीस काढले असेल त्यांना या अनुदानाचा लाभ दिला जाणार होता पण शासनाकडे या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती ज्या सहकार विभागाच्या सॉफ्टवेअर मध्ये भरली होती, त्यावेळी अनेक पात्र व प्रामाणिक शेतकऱ्यांना त्यातून अपात्र ठरवण्यात आले आणि हा प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय आहे. नियमित कर्जफेड करणारे आणि प्रामाणिक शेतकऱ्यांना अपात्र करून अन्याय केला जात. यावेळी  आंदोलन अंकुश संघटनेकडून येत्या 26 जानेवारी पर्यंत प्रोत्साहन पर अनुदानातील अपात्र शेतकऱ्यांना सर्व अटी व निकष दूर करून प्रोत्साहन पर अनुदान देण्यात यावे अन्यथा 26 जानेवारी 2024 रोजी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला 
   

त्यावेळी आंदोलन अंकुश चे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे तालुका अध्यक्ष दीपक पाटील अण्णसो वडगावे दत्तात्रय जगदाळे एकनाथ माने राहुल माने अप्पासो कदम संजय चौगुले विकास शेषावरी बाळासो भोगावे सुरेश माने धनाजी देसाई वाखरेकर दत्तात्रय माने इत्यादी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते


अन्यथा 26 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार