बातम्या
अन्यथा, पूर्वसूचना न देता साखर सहसंचालक कार्यालयास ठाळे ठोकणार-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
By nisha patil - 7/2/2024 11:33:27 PM
Share This News:
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर - गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ज्या साखर कारखान्यांनी ३ हजार रूपयापेक्षा कमी दर दिलाय त्या कारखान्यांना प्रतिटन १०० रूपये व ज्या कारखान्यांनी ३ हजार रूपयापेक्षा जादा दर दिलाय, त्यांना प्रतिटन ५० रूपये प्रतिटन देण्याचा तोडगा मान्य करण्यात आलेला होता. त्याप्रमाणे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी येत्या आठवड्याभरात तातडीनं शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडके यांचेकडे करण्यात आली.
गतवर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आंदोलन करत पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग १० तास रोखून धरला होता. यावेळेस कोल्हापूरचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी शासनाबरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार, ज्या साखर कारखान्यांनी ३ हजार रूपयापेक्षा कमी दर दिलाय त्या कारखान्यांनी प्रतिटन १०० रूपये व ज्या कारखान्यांनी ३ हजार रूपयापेक्षा जादा दर दिलाय त्यांना प्रतिटन ५० रूपये प्रतिटन देण्याचा तोडगा मान्य केला होता.
आज स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी साखर सहसंचालक कार्यालयात प्रभारी अधिकारी गोपाळ मावळे यांना चांगलेच धारेवर धरले. सोमवारपर्यंत शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यास कोणतीही पुर्वसुचना न देता कार्यालयास टाळे टोकणार असल्याचं ठणकावून सांगितलं. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये ३१ जानेवारी अखेर चालू गळीत हंगामातील क्रांती साखर कारखान्याची ४० कोटी, वारणा कारखाना २७ कोटी, आजरा १० कोटी, भोगावती ६ कोटी, हुतात्मा १४ कोटी, सदाशिवराव मंडलिक ९ कोटी, कुंभी ५ कोटी, रूपयाची एफआरपी थकीत आहे.
शासनाकडून दोन महिन्याच्या आत परवानगी घेऊन साखर कारखान्यांनी सदरचा दुसरा हप्ता ऊस उत्पादक शेतक-यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे वतीनं जिल्हाधिकारी यांनी लेखी हमी पत्राद्वारे त्यावेळी कळवलंय. मात्र, हंगाम सुरू होवून दोन महिने उलटून गेले तरीही याबाबत शासन अथवा कारखानदारांकडून कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. शासनाकडून व कारखानदार यांचेकडून जाणीवपुर्वक वेळकाढूपणा केला जात असून यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.
साखर कारखान्यांनी तातडीनं गत हंगामातील दुसरा हप्ता शेतक-यांच्या खात्यावर एक आठवड्यात वर्ग करावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं साखर सहसंचालक कार्यालयास कोणतीही पुर्वसुचना न देता ठाळे ठोकून व साखर कारखान्यांची साखर अडवून आंदोलन करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
यावेळी प्रा.डॅा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, सागर शंभुशेटे, राजाराम देसाई, धनाजी पाटील, विठ्ठल मोरे, राम शिंदे, संपत मोरे, अण्णा मगदूम यांचेसह पदाधिकारी ऊपस्थित होते.
अन्यथा, पूर्वसूचना न देता साखर सहसंचालक कार्यालयास ठाळे ठोकणार-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
|