विशेष बातम्या
सीकरणासाठी शाळाबाह्य मुलांचा समावेश करावा - वैद्यकीय मंत्री मुश्रीफ
By nisha patil - 3/15/2025 3:02:54 PM
Share This News:
सीकरणासाठी शाळाबाह्य मुलांचा समावेश करावा - वैद्यकीय मंत्री मुश्रीफ
तालुका निहाय लसीकरणाचे नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
लसीकरणाची जनजागृती पुढील सात दिवसांमध्ये करण्याचे निर्देश
जिल्ह्यातील तीन लाख मुलींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक एचपीव्ही लस दिली जाणार आहे. या लसीकरणाच्या मोहिमेचे तालुका निहाय नियोजन करण्याचे निर्देश वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. ही लसीकरण मोहीम मंत्री मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून विविध कंपन्यांच्या सीएसआर, दानशूर व्यक्ती, आणि वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागातील अधिकारी यांच्या सहयोगाने राबविण्यात येत आहे.
मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, शाळाबाह्य मुलांचा देखील लसीकरण मोहिमेत समावेश केला जावा आणि प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून ठेवावी, ज्यामुळे लसीकरणावेळी उपलब्ध नसलेल्या मुलींनाही सोयीनुसार लस घेता येईल.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले की, प्रत्येक तालुका निहाय लसीकरणाचे नियोजन केले जाईल. जिल्हा परिषद, प्राथमिक व माध्यमिक शाळा शिक्षणाधिकारी या नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका पार पडतील. मुलींना आवश्यक माहिती देण्यासाठी व पालकांची सहमती घेण्यासाठी प्रक्रिया राबवली जाईल.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर आणि गटशिक्षण अधिकारी उपस्थित होते.
सीकरणासाठी शाळाबाह्य मुलांचा समावेश करावा - वैद्यकीय मंत्री मुश्रीफ
|