बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात डेंग्यूच्या साथीचा उद्रेक
By nisha patil - 7/1/2025 7:50:05 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढतच आहेत. गेल्या तीन वर्षात दरवर्षी डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत चाललीय. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त रुग्ण आढळून येतायेत. जिल्ह्यातही काही भागात डेंग्यूच्या साथीचा उद्रेक होतोय. गेल्यावर्षी 2023-24 मध्ये 12 ठिकाणी साथीचा उद्रेक झाला. त्यात 551 रुग्ण आढळलेत.
कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यूचा डंख वाढत चाललाय. गेल्या तीन वर्षात दरवर्षी डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत चाललेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जादा रुग्ण आढळून येतायेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात या आजाराचे रुग्ण आता वर्षभर आढळून येताना दिसतायेत. जिल्ह्यातही काही भागात डेंग्यूच्या साथीचा उद्रेक होतोय. गेल्या तीन वर्षात त्यात वाढ होत चाललीय. जिल्ह्यात 2021-22 मध्ये चार ठिकाणी डेंग्यूची साथ आली होती. तर त्यात 88 रुग्ण आढळून आले. 2022-23 मध्ये 11 ठिकाणी साथ आली. त्यात 87 रुग्ण आढळले तर गेल्यावर्षी 2023-24 मध्ये 12 ठिकाणी साथीचा उद्रेक झाला. त्यात 551 रुग्ण आढळलेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात डेंग्यूच्या साथीचा उद्रेक
|