बातम्या
पी एन पाटील यांचे पुतणे धीरज पाटील यांचा भीषण अपघात...
By nisha patil - 3/15/2025 4:20:17 PM
Share This News:
टेबलाई टोल नाक्यावर मध्यरात्रीचा भीषण अपघात...
पी एन पाटील यांचे पुतणे धीरज पाटील यांचा जागीच मृत्यू
कोल्हापूरच्या टेबलाई टोल नाक्यावर मध्यरात्री दोनच्या सुमारास भीषण अपघात घडला. एका भरधाव कारने नऊ दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. ही कार धीरज पाटील यांची असल्याचा समोर आलय. ते स्वर्गीय पी. एन. पाटील यांचे पुतणे असून धीरज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी ते स्वतः कार चालवत होते आणि त्यांना अचानक हार्ट अटॅक आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस तपास सुरू आहे.
पी एन पाटील यांचे पुतणे धीरज पाटील यांचा भीषण अपघात...
|