बातम्या

१० वर्षांपूर्वी मिळवलेली PHD राज्यपालांनी केली रद्द ...

PHD obtained 10 years ago canceled by Governor


By nisha patil - 10/26/2023 12:55:18 PM
Share This News:



१० वर्षांपूर्वी मिळवलेली PHD राज्यपालांनी केली रद्द ...

 पीएचडी चोरीला थेट राज्यपालांकडून दखल 

संभाजीनगरच्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात  चक्क पीएचडी चोरल्याचा प्रकार समोर 

65 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएचडी 'कॉपी पेस्ट'मुळे रद्द झाली

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएचडी 'कॉपी पेस्ट'मुळे रद्द झाली आहे.याची गंभीर दखल घेऊन थेट राज्यपाल कुलपती रमेश बैस  यांनी या पीएचडीचे संशोधनच रद्द केल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.

आतापर्यंत आपण अनेक चोरीच्या घटना पहिल्या असतील, पण छत्रपती संभाजीनगरच्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात  चक्क पीएचडी  चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन थेट राज्यपाल कुलपती रमेश बैस  यांनी या पीएचडीचे संशोधनच रद्द केल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. . किशोर निवृत्ती धावे असे 'कॉपी-पेस्ट' करणाऱ्याचे नाव असून, धावे यांनी राज्यशास्त्र विषयाच्या प्रबंधात 51 ते 65 टक्के चोरी केल्याचे समोर आले आहे. 
     

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत आतापर्यंत वेगवेगळ्या विषयात अनेकांनी पीएचडी मिळवली आहे. यासाठी संशोधन करून पीएचडीधारक पदवी मिळवत असतात. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पीएचडी 'कॉपी पेस्ट'मुळे रद्द करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.


१० वर्षांपूर्वी मिळवलेली PHD राज्यपालांनी केली रद्द ...