बातम्या

फायनल मॅचला PM MODI आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान लावणार हजेरी...?

PM Modi and Prime Minister of Australia will attend the final match


By nisha patil - 11/17/2023 7:47:08 PM
Share This News:



 फायनल मॅचला मोदींसोबत मंत्रिमंडळातले अजून कुठले सदस्य हजर असणार?. वर्ल्ड कप 2023 ची फायनल मॅच पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज आणि उप पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. अशी माहिती समोर आली आहे. 

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला भारत-ऑस्ट्रेलियामध्ये ICC वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना होणार आहे. हा रोमांचक सामना पाहण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हजर असतील. इतकच नाही, या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज आणि उप पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. निमंत्रण स्वीकारुन ते सुद्धा फायनल पाहण्यासाठी येतील, अशी अपेक्षा आहे. अजूनपर्यंत दोघांकडून कंफर्मेशन आलेलं नाहीय. ऑस्ट्रेलियन टीम आठव्यांदा वर्ल्ड कप फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरेल, तेच टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाने पाचवेळा तर टीम इंडियाने दोनवेळा वर्ल्ड कप जिंकलाय. आता दोंघांमध्ये कोण वर्ल्ड कपची बाजी मारणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.


फायनल मॅचला PM MODI आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान लावणार हजेरी...?