विशेष बातम्या

पीएमओ ऑफिसने घेतली राजू मोरे यांच्या कार्याची दखल

PMO office took notice of Raju Mores work


By nisha patil - 6/19/2023 5:12:48 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूरातील फुलेवाडीत  ऋग्वेदा मोरे फाउंडेशनकडून घरातील खराब झालेल्या आणि जीर्ण झालेल्या देवदेवतांचे फोटो, दिवंगत व्यक्तीचे फोटो ,नदीकाठी किंवा ओढ्याकाठी पडलेल्या फोटो, मूर्ती गोळा  करून त्याचा पुनर्वापर करून त्यापासून मूर्ती तयार  किंवा लगद्यापासून अनेक वस्तू तयार करण्याचे काम सुरू आहे.  या फाऊंडेशन चे  संस्थापक अध्यक्ष राजू मोरे यांनी हा उपक्रम कोल्हापुरातील पंचगंगा नदी, शिंगणापूर घाट, प्रयाग चिखली  या ठिकाणी हा उपक्रम  राबवला होता. या उपक्रमाला समाजातून भरभरुन प्रतिसाद मिळाला. राजू मोरे यांच्या कार्याची दखल पीएमओ ऑफिसने  देखील घेतली असून, शुक्रवारी पीएमओ ऑफिस ने राजू मोरे यांना संपर्क करून त्याबाबतची माहिती त्यांना दिली. रविवारी  पीएमओ ऑफिस कडून त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मन की बात मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.


पीएमओ ऑफिसने घेतली राजू मोरे यांच्या कार्याची दखल