बातम्या
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा
By nisha patil - 10/23/2023 7:22:55 PM
Share This News:
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा
डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि प. बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील त्यांच्या यशवंत निवासस्थानी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सकाळपासून रीघ लावली होती. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथेही ग्रुपच्यावतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८४ साली कसबा बावडा येथे पहिले विनाअनुदानित अभियांत्रिकी महविद्यालय सुरू केले. त्यानंतर कोल्हापूर, मुंबई व पुणे येथे डी वाय पाटील ग्रुपचा विस्तार करत अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, हॉस्पीटल, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था सुरू केल्या. दादासाहेबांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून आज ७ विद्यापीठे, १६२ संस्था, २२ हजाराहून अधिक कर्मचारी, सव्वा चार लाखाहून अधिक माजी विद्यार्थी असा संस्थेचा मोठा विस्तार झाला आहे.
शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या दादासाहेबांनी रविवारी वयाच्या 89 व्या वर्षात पदार्पण केले.'आनंदी आणि उत्साही आयुष्य जगण्यासाठी अहंपणा, मत्सर आणि द्वेष यांचा त्याग करा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करा' असा नेहमीच आशावादी संदेश समाजाला देणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा वाढदिवस म्हणजे सर्वांच्यासाठी एक आनंद सोहळाच.
त्यांचा हा वाढदिवस साधेपणाने कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील त्यांच्या यशवंत निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या. सकाळपासून त्यांचेवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्त्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती. यावेळी, पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत अनेकांशी आत्मियतेने संवाद साधला.
शाहू महाराज छत्रपती यांनी निवास्थानी भेट देऊन दादासाहेबाना शुभेच्छा दिल्या. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत त्यांचे आशीर्वाद घेतले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला क्रीडा, साहित्यिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच डी वय पाटील ग्रुपच्या विविध संस्थातील प्रमुख पदाधिकाऱ्यानी प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीवरून दादासाहेबांना शुभेच्छा दिल्या.
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीने पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मेडिकल कॉलेज येथे पारंपारिक वाद्यांच्या गजरात दादासाहेबांचे स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करत व टाळ्यांच्या गजरात दादासाहेबांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथेही कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. बाल विद्यार्थ्यासमवेत दादासाहेबांनी केक कापला.
यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील,
विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सचिव श्रीपाद धरणगुत्ती, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. जे. ए. खोत, अभय जोशी, प्राचार्य डॉ.संतोष चेडे, प्राचार्य डॉ.महादेव नरके, रजिस्ट्रार लितेश मालदे, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. शिंपा शर्मा, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. अभिजीत माने, डॉ. सतीश पावसकर, डॉ. राजेंद्र रायकर, संजय जाधव, कृष्णात निर्मळ, अजित पाटील यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य, प्रमुख पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. चंद्रकुमार नलगे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकुमार नलगे लिखित "खेळ हा जीवनाचा" या पुस्तकाप्रकाचे प्रकाशन पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांच्या हस्ते झाले.
कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा वाढदिवस उत्साहत साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. संजय डी. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. राकेश कुमार मुदगल, डॉ. के. प्रथापन, डॉ व्हि. व्ही भोसले, डॉ जे ए खोत, अभय जोशी, डॉ.संतोष चेडे, डॉ.महादेव नरके, डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. शिंपा शर्मा, डॉ. वैशाली गायकवाड, संजय जाधव आदी.
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा
|