बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यात पैजाना ऊत

Paijana tissue in Kolhapur district


By nisha patil - 9/5/2024 7:28:04 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी "जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची निवडणूक इतक्या प्रतिष्ठेची आणि चर्चेची बनली आहे. राज्यातील राजकारणात झालेली उलथा-पालथ, महायुतीच्या उमेदवारांबाबत असलेली नाराजी, आणि महाविकास आघाडीतूने समोर आलेले तुल्यबळ उमेदवार यामुळे यंदाची निवडणूक तितकीच महत्वपूर्ण बनली आहे. 

दोन्हीही मतदारसंघात तुल्यबळ लढत होत असताना प्रत्यक्षात मतदानात मात्र कार्यकर्त्यांमध्ये अजूनही तितकीच इर्षा आणि उमेदवारा प्रती असलेली निष्ठा पाहायला मिळत आहे. गावागावातील गल्ली, चौक, पार आणि चावडीवर कोणता उमेदवार निवडून येणार याचीच चर्चा रंगली आहे. केवळ चर्चा रंगली नाही तर पाचशे रुपयांपासून ते एक लाखांपर्यंत पैजा एकमेकांच्या कार्यकर्त्यांनी लावल्या आहेत. पण प्रत्यक्षात 4 जूनलाच या कार्यकर्त्यांचे पितळ उघड पडणार आहे हे नक्की."


कोल्हापूर जिल्ह्यात पैजाना ऊत