बातम्या

कोल्हापूरचा चित्रकारांचा रंगबहार मध्य प्रदेशात बहरणार

Painters of Kolhapur will flourish in Madhya Pradesh


By nisha patil - 9/25/2023 5:37:11 PM
Share This News:



 कलानगरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरच्या अभिजात चित्रकारांचा ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे कल्पतरू आर्ट गॅलरीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने  चित्र प्रात्यक्षिक आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रोफेसर वासंती जोशी कला सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रमोद कुमार जोशी यांनी आज कोल्हापुरातील चित्रकारांची भेट घेऊन संवाद साधला.
     

त्यावेळी ते म्हणाले की , कोल्हापूरच्या मातीशी आमची नाळ जुळली असून प्रोफेसर वासंती जोशी हे अभिनेते कैलासवासी चंद्रकांत मांडरे यांच्याकडे कला संस्कृतीचे धडे घेतले होते त्यांच्या नावे ग्वाल्हेर मध्ये आम्ही कल्पतरू आर्ट गॅलरी सुरू करत आहोत. त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर कलाकारांचा सन्मान करण्यासाठी  आम्ही कोल्हापुरातील चित्रकारांचे ग्वाल्हेर येथे २५ ते २६ नोव्हेंबर अखेर चित्र प्रात्यक्षिक आणि प्रदर्शन आयोजित केले आहे. या चित्रकारांमध्ये चित्रकार प्राचार्य अजय दळवी.,प्राचार्य राजेंद्र हंकारे ,प्रशांत जाधव विजय टिपुगडे, धीरज सुतार, सूर्यकांत निंबाळकर, अरुण सुतार, संपत नायकवडी ,जगन्नाथ भोसले, अभिजीत कांबळे, प्रवीण वाघमारे बबन माने . मनोज सुतार ,श्रीरंग मोरे आणि सुनील पंडित आदी चित्रकार आपले चित्र प्रदर्शन सादर करणार आहेत. यांच्यासोबत ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथील स्थानिक चित्रकार ही यामध्ये सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितले 
       

या कार्यक्रम प्रसंगी शाहीर राजू राऊत कोल्हापूर वस्तु संग्रहालयाचे पदाधिकारी उदय सुर्वे , उत्तम कांबळे. इतर मान्यवर कलावंत उपस्थित होते


कोल्हापूरचा चित्रकारांचा रंगबहार मध्य प्रदेशात बहरणार