बातम्या

पाकिस्तानी चाहत्यांना क्रिकेटमधील पराभव खूपच जिव्हारी...

Pakistani fans are very saddened by the defeat in cricket


By nisha patil - 6/19/2024 12:58:56 PM
Share This News:



 पाकिस्तानी चाहत्यांना क्रिकेटमधील पराभव खूपच जिव्हारी लागतो. त्यात भारत आणि दुबळ्या संघाने पराभूत केलं तर मग टीव्ही फुटल्याच समजा. आयसीसी चषकात पाकिस्तानवर अनेकदा नामुष्की ओढावली आहे.व्हायरल व्हिडीओनंतर हारिस रऊफने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून त्याने या घटनेबाबत सविस्तर सांगितलं आहे.

“मी ठरवलं होतं की ही गोष्ट सोशल मीडियावर टाकायची नाही. पण हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. त्यामुळे तेव्हा नेमकं काय घडलं हे सांगणं भाग पडलं आहे. पब्लिक फिगर असल्याने आम्हाला सर्व प्रकारचा फीडबॅक चाहत्यांकडून मिळत असतो. आम्ही त्यांचा पाठिंबा आणि रोष दोन्ही स्वीकार करतो. पण जेव्हा ही गोष्ट माझ्या आई वडील आणि कुटुंबावर येते तेव्हा मी गप्प बसणार नाही. त्याला प्रतिकार करण्यास मी मागे पुढे पाहणार नाही.कुटुंबियांचा आदर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या प्रोफेशनचा राग त्यांच्यावर काढू नये.”, असं हारिस रऊफने आपल्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे


पाकिस्तानी चाहत्यांना क्रिकेटमधील पराभव खूपच जिव्हारी...