बातम्या
रुकडी येथे अष्टपद तीर्थक्षेत्र पंचकल्याण महोत्सव उत्साहात संपन्न
By nisha patil - 3/2/2025 12:59:13 PM
Share This News:
रुकडी येथे अष्टपद तीर्थक्षेत्र पंचकल्याण महोत्सव उत्साहात संपन्न
महत्वपूर्ण नियोजनाबद्दल उपसरपंच शितल खोत, किरण पाटील व ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे यांचा सन्मान
रुकडी | प्रतिनिधी रुकडी येथील अष्टपद तीर्थक्षेत्रात 19 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान भव्य पंचकल्याण महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विविध सरकारी यंत्रणांच्या समन्वयासोबत पाहुण्यांचे स्वागत, परवाने, स्वच्छता, आरोग्यसेवा, बांधकाम, परिवहन, वीजपुरवठा अशा अनेक जबाबदाऱ्या अत्यंत प्रभावीपणे पार पाडण्यात आल्या.
यामध्ये रुकडी गावचे सुपुत्र व माजी उपसरपंच श्री. शितल खोत, उद्योजक किरण पाटील आणि लोकप्रिय ग्रामविकास अधिकारी श्री. बाबासाहेब कापसे यांनी विशेष योगदान दिले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल अष्टपद तीर्थक्षेत्र कमिटीच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला ट्रस्टचे अध्यक्ष अभिनंदन खोत, डॉ. व्ही. एन. पाटील, अमित चिंचवडे, आदिनाथ किनिंगे, सुभाष चौगुले आणि दिगंबर जैन समाजातील प्रतिष्ठित मान्यवर व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महोत्सवाच्या यशस्वी नियोजनाबद्दल सर्व उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन केले आणि भाविकांनी या धार्मिक सोहळ्यात भावपूर्ण सहभाग नोंदवला.
रुकडी येथे अष्टपद तीर्थक्षेत्र पंचकल्याण महोत्सव उत्साहात संपन्न
|