बातम्या
पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी
By nisha patil - 7/26/2023 6:03:15 PM
Share This News:
सात ते आठ दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या औद्योगिक सेलचे सचिव व युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या समवेत आज संभाव्य पूरग्रस्त भागात पाहणी दौरा केला आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच महापालिका प्रशासनाला आवश्यक ती उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या.
शाहूपुरी येथील कुंभार गल्ली तसेच बापट कॅम्प परिसरात गणेशमूर्ती बनविल्या जातात. श्री गणेशोत्सव जवळ आल्याने या ठिकाणी मूर्ती बनविण्याची लगबग सुरु आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा विचार करून या सर्व सुरक्षितस्थळी हलविण्याची कुंभार बांधवांना विनंती केली. गणेश मूर्ती सुरक्षितच ठिकाणी ठेवण्यासाठी मार्केट यार्ड येथील गोदामे द्यावीत अशी विनंती कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती भारत पाटील भूयेकर व संचालक मंडळांना भेटून काँग्रेसच्या औद्योगिक सेलचे सचिव व युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी केली.
नागळा पार्क महावीर गार्डन परिसरातील नागरिकांशी भेट घेऊन संवाद साधला. येथील ड्रेनेज लाईन व चेंबरचे काम अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. हे काम त्वरित सुरू करावे अशी सूचना महापालिका प्रशासनाला दिल्यानंतर, सोमवारपासून काम सुरू करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने यावेळी दिले.
यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर प्रकाश नाईकनवरे, अर्जुन माने, सागर तहसीलदार, राजेंद्र डकरे, माजी नगरसेविका पूजा नाईकनवरे, सामाजिक कार्यकर्ते अमर समर्थ, गणी आजरेकर, दीपक चोरगे, संजय शेटे, सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, कुमार आहुजा, महेंद्र कुंभार, प्रकाश तारळेकर, विजय पुरेकर, सतिश बाचणकर, महेश वारके, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, ड्रेनेज सहाय्य्क अभियंता आर.के. पाटील यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, भागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी
|