बातम्या
पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल 'नागरिकांना स्थलांतराच्या सूचना
By nisha patil - 7/20/2024 2:24:25 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्हयात मुसळधार पावसाने थैमान घातलय. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मोठया प्रमाणावर पाऊस कोसळत असल्याने नद्या नाले ओसंडून वाहू लागले . गेल्या दोन दिवसांत राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालीय .पंचगंगेच पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आलय . एका दिवसांत नदिची पाणीपातळी तब्बल ९ फुटांनी वाढलीय .नदीचे पाणी कोणत्याही क्षणी गायकवाड वाडा ते शिवाजी पूल या मार्गावर येण्याची शकयता आहे .तर सुतारवाडा येथील नागरिकांना संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनाने स्थलांतराच्या सूचना दिल्यात .आज दुपारच्या अहवालानुसार राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ३६ फुटांवर असून नदिची इशारा पातळी जाण्यासाठी फक्त ३ फूट बाकी आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलय.
तर जिल्ह्यातील ७७ बंधारे पाण्याखाली गेलेत.
पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल 'नागरिकांना स्थलांतराच्या सूचना
|