बातम्या
एप्रिल महिन्यात होणाऱ पंचकल्याण पूजा महोत्सव...
By nisha patil - 2/21/2025 5:59:06 PM
Share This News:
एप्रिल महिन्यात होणाऱ पंचकल्याण पूजा महोत्सव...
यशस्वी आयोजनासाठी नियोजन बैठक संपन्न...
इचलकरंजी जैन बोर्डिंग येथे एप्रिल महिन्यात होणाऱ्या पंचकल्याण पूजा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन बैठक पार पडली. आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन, भक्तगणांची व्यवस्था आणि भोजन सुविधा यावर चर्चा झाली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, जैन समाजाचे मान्यवर आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी या सोहळ्यास शुभेच्छा देत संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली आणि हा महोत्सव भव्य आणि दिव्य करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले.
एप्रिल महिन्यात होणाऱ पंचकल्याण पूजा महोत्सव...
|