बातम्या
वाळलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
By nisha patil - 4/7/2023 1:17:52 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम : जिल्ह्यात उपसा बंदी आणि पावसाअभावी पिके वाळून गेली आहेत यामुळे वाळलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा याची शेतकऱ्यांना भरपाई द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेकेली मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना सोमवारी देण्यात आले पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्या आवश्यक आहे धरणातील पाणीसाठा ही मर्यादित आहे त्यातच विद्युत कंपनीने शेतीसाठी विद्युत पुरवठ्यामध्ये कपात केली आहे आणि एक ठिकाणी उपसा बंदी लागू केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीवर विपरीत परिणाम झाला आहे हजारो एकर शेती वाळून गेली आहे उपसाबंदी लागू केल्याने ऊस सोयाबीन तसेच भाजीपाला यादी सर्व पिके होरपळून गेली अद्यापही मान्सून लांबल्याने संपूर्ण जून महिना पूर्णतः कोरडा गेला आहे अनेक नद्यांनी तळ गाठलेला आहे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे असे असताना शासनाकडून अद्यापही पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात झालेली नाहीतरी पंचनामे करण्यात चालढकल केली जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे
यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जालिंदर पाटील, अनिल मादनाईक , जनार्दन पाटील , अजित पवार , भाऊ साखरपे , राम शिंदे , रावसाहेब डोंगळे यादी उपस्थित होते
वाळलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
|