बातम्या

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

Pandit Deendayal Upadhyay Employment Fair concluded


By nisha patil - 3/2/2025 8:50:26 PM
Share This News:



पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

कोल्हापूर, दि. 3– जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभात एम.आर. बहिरशेट, स.प्र. सल्लागार, BTRI विभाग यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वाय.बी. पाटील, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, श्री. संग्राम पाटील IMC चेअरमन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमामध्ये एम.एस. आवटे, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर आणि श्री. जमीर करीम, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर यांनी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले.

मेळाव्यात एकूण २४ उद्योजकांनी ६२८ रिक्तपदांसाठी सहभाग नोंदवला. मेळाव्यात २०४ उमेदवार उपस्थित होते, त्यापैकी २६७ उमेदवारांनी विविध पदांसाठी मुलाखती दिल्या. प्राथमिक निवडीमध्ये १७८ उमेदवारांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.आर. घोरपडे, क.प्र. सल्लागार यांनी केले. तसेच एस.एस. माने, शिल्पनिदेशक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 


पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न
Total Views: 64