ताज्या बातम्या
पंडित दीदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न – १५१ उमेदवारांची प्राथमिक निवड
By nisha patil - 2/20/2025 6:28:23 PM
Share This News:
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न – १५१ उमेदवारांची प्राथमिक निवड
कोल्हापूर (दि. २०) – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक) यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोली एमआयडीसी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात २० उद्योजकांनी ६८८ रिक्तपदांसाठी सहभाग नोंदविला.
११० उमेदवारांनी उपस्थिती लावली, तर १६७ जणांनी मुलाखती दिल्या, त्यापैकी १५१ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
मेळाव्याचे उद्घाटन स्मॅकचे ऑ. सेक्रेटरी शेखर कुसाळे आणि खजानिस बदाम पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक व तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी ठरल्याबद्दल सहभागी कंपन्यांनी समाधान व्यक्त केले, अशी माहिती सहायक आयुक्त जमीर करीम यांनी दिली.
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न – १५१ उमेदवारांची प्राथमिक निवड
|