बातम्या
देवदूता बनले पन्हाळा पोलीस
By nisha patil - 6/10/2023 7:47:52 PM
Share This News:
पन्हाळगड हा नेहमीच पर्यटनासाठी युवक युवतींना आकर्षित करतो आज दुपारी 03: 40चे दरम्यान संकेत नामदेव लाड रा. राशिवडे बुद्रुक आणि वैभवी उदय पाटील रा राशिवडे बुद्रुक दोघे पन्हाळगडावरून पावनगड पाहण्यासाठी गेले होते.पावनगडाचे तटबंदी जवळ गेल्यानंतर त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यांचा आवाज एकूण जमलेल्या लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी पन्हाळा पोलीस याना पाचारण केले
घटनेची माहिती मिळताच पोलिसानी तात्काळ पावनगडाचे तडबंदीचे ठिकाणी हजार झाले,त्या ठिकाणी पन्हाळा पोलीस उपनिरीक्षक श्री मलगुंडे, पोलीस नाईक ब विश्वास जाधवर, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल केर्लेकर, पोलीस कॉन्स्टेबल वायदंडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील व मुख्यालय कडील बंदोबस्त करिता असलेले पोलीस कॉन्स्टेबल मर्दाने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तेथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले त्यानंतर त्यांना पन्हाळा ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले पन्हाळा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता त्यांना सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे पाठविण्यात आले आहे. दोघेही युवक युवती सुरक्षित असून किरकोळ जखमी आहेत. घटनेबाबत त्याचे पालकांना कळविण्यात आले आहे. अशी माहिती पन्हाळा पोलिसांनी दिली आहे.यादरम्यान युवक युवती पर्यटनासाठी गेले होते कि आत्महत्या करणेसाठी गेले होते अशी उलटसुलट चर्चा स्थानिक लोक करत आहेत पोलिसाचे सतर्कतेमुळे दोघांचे प्राण वाचले आहेत
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन युवक युवतीचा प्राण वाचवलेने देवदूत बनलेल्या पन्हाळा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे
देवदूता बनले पन्हाळा पोलीस
|