बातम्या

बीड लोकसभा निवडणुकीवर पंकजा मुंडे म्हणाल्या ...

Pankaja Munde said on Beed Lok Sabha election


By nisha patil - 2/29/2024 4:13:53 PM
Share This News:



मुंबई ।  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उरवण्याची भाजपची तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे. प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीचं तिकिट मिळू शकतं. तर पंकजा यांनी लोकसभेची निवडणूक लढल्यास धनंजय मुंडे त्यांचे स्टार प्रचारक म्हणून काम पाहतील, अशी माहिती समोर आली आहे. राज्याच्या राजकारणात याची चर्चा होतेय. यावर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्या आज मुंबईत आढावा घेत आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
  
पंकजा मुंडे म्हणाल्या ,पूर्ण मी संघटनेच्या रोलमध्ये आहे. प्रीतम मुंडे दहा वर्षे खासदार राहिल्या आहेत. त्यांनी चांगलं काम केलं. राष्ट्रवादीसोबत युती झाल्यामुळे माझ्या मतदारसंघावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मी राज्यातच नव्हे देशात स्टार प्रचारक राहिलेले आहे. त्यामुळे माझ्या लोकसभेच्या उमेदवार कोणी असो स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी माझी असेल. भविष्यात राष्ट्रवादीची युती असेल त्यांचे स्टार प्रचारक कोण असेल ते त्यांचे ठरवतील. भारतीय जनता पार्टीचे निर्णय दिल्लीत होतात. तिथे आम्हीच पोहोचू शकतो, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.


बीड लोकसभा निवडणुकीवर पंकजा मुंडे म्हणाल्या ...