राजकीय
अजित पवारांच्या शिस्तबद्ध कामाची पंकजा मुंडेंकडून प्रशंसा
By nisha patil - 1/16/2025 3:17:30 PM
Share This News:
अजित पवारांच्या शिस्तबद्ध कामाची पंकजा मुंडेंकडून प्रशंसा
बारामतीच्या धर्तीवर मराठवाड्याचा विकास करण्याचा पंकजा मुंडे यांचा निर्धार
बारामतीच्या विकासामुळे भारावलेल्या मंत्री पंकजा मुंडे, अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचं तोंडभरून कौतुक केले. आपल्या मतदारसंघातही तसाच विकास करण्याचा निर्धार त्यांनी बारामतीतल्या विकास कामांची पाहणी करताना व्यक्त केला. यावेळी त्या भारावून गेल्या.
राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बारामतीतल्या विकासकामांची पाहणी केली आणि ती पाहून भारावून गेल्या. बारामतीच्या प्रत्येक विकासकामावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष असते आणि त्यांचा शिस्तबद्ध व वक्तशीरपणा हेच यशाचे गमक असल्याचं त्यांनी सांगितलं. पंकजा मुंडे यांनी आपल्या मतदारसंघातही बारामतीसारखाच विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बारामतीच्या विकासाने प्रेरित होऊन त्या मराठवाड्यातही तसाच सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे."
अजित पवारांच्या शिस्तबद्ध कामाची पंकजा मुंडेंकडून प्रशंसा
|