बातम्या

पक्षफोडी आणि घरफोडी करणारा पनवती म्हणजे संजय राऊत - नितेश राणे

Panvati who is party burglar and burglar is Sanjay Raut


By nisha patil - 11/25/2023 4:48:51 PM
Share This News:



क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला. या पराभवानंतर सर्वच भारतीय आणि क्रिकेटप्रेमीचं हृदय तुटलं, मात्र यादरम्यान, सोशल मीडियावर पनौती ट्रेंड सुरू झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्यादरम्यान पंतप्रधान मोदी उपस्थित होते. म्हणून भारतीय संघ हरला असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं. तर पराभवानंतर खेळाडू निराश झाले होते मात्र मोदींनी ड्रेंसिंगरूममध्ये जाऊन त्यांना प्रोत्साहन दिल्याचे पाहायला मिळाले. अशा परिस्थितीत पनौतीचा ट्रेंड अनेकांना समजला नसला तरी राज्याच्या राजकारणात पनवतीवरून आरोप प्रत्यारोप होताना दिसतोय. महाराष्ट्रात पनवती समजले जाणारे बाहेर  बाहेर जावून हिंदूत्वाचा प्रचार करतात इथे कोणी विचारत नाही, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला. यावर प्रत्युत्तर देत भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांना एकेरी उल्लेख करत धारेवर धरले  ते म्हणाले ....


पक्षफोडी आणि घरफोडी करणारा पनवती म्हणजे संजय राऊत - नितेश राणे