बातम्या

पप्पा आरक्षण घेवून येतील

Papa will take the reservation


By nisha patil - 1/20/2024 7:24:12 PM
Share This News:



पप्पा आरक्षण घेवून येतील;

 पत्नी, मूलं आणि अख्ख जरांगे कुटुंब झालं भावूक

मराठ्यांची एकजूट सोडू नका, माझं काहीही झालं तरीही चालेल अशा भावना व्यक्त करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रवास सुरु केलाय. त्यामुळंं मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा वातावरण तापू लागलंय. मनोज जरांगे हे समर्थकांसह मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत. यावेळी त्यांची पत्नी आणि मूलं भेटल्यानंतर जरांगेसह सर्वजण भावूक झाले. यावेळी पप्पा आरक्षण घेवून येतील असं त्यांच्या मुलीनं भावना व्यक्त केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, मराठा समाजचं माझं कुटुंब आहे. मराठा समाजासाठी मी कोणत्याही थराला जायला तयार आहे. समाजासाठी मी गोळ्याही झेलायला तयार आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली आता मराठाच दिसतील. माझी लढाई मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. आता सगळ्या मराठ्यांंनी घराबाहेर पडून आपली ताकद अख्ख्या जगाला दाखवा असं आवाहनही जरांगे पाटील यांनी म्हटलंय.


पप्पा आरक्षण घेवून येतील