बातम्या

विविध ठिकाणाहून मिळालेल्या मुलांचे पालक व नातेवाईकांनी संपर्क साधावा

Parents and relatives of children received from different places should be contacted


By nisha patil - 3/15/2024 12:23:42 PM
Share This News:



कोल्हापूर,  : कोल्हापूर शहरात विविध ठिकाणाहून मिळून आलेल्या मुलांच्या पालकांचा व नातेवाईकांचा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कोल्हापूर, बाल कल्याण समिती, कोल्हापूर व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कोल्हापूर यांच्याकडून शोध सुरु असून या बालकांच्या पालक, नातेवाईकांनी दिलेल्या दूरध्वनी, मोबाईलवर संपर्क करण्याचे किंवा प्रत्यक्ष येऊन भेटण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.एस. वाईंगडे यांनी केले आहे.

बाल कल्याण समिती, कोल्हापूर यांच्याव्दारे एका अल्पवयीन मुलाला काळजी व संरक्षणाची गरज असल्याने त्यांना भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, नवचैतन्य बालगृह, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे दाखल केले आहे. या बालकास आईने समिती समोर हजर केले होते. समितीने काळजी व संरक्षणासाठी बालकास शिशुगृह, कोल्हापूर येथे दाखल केले. त्यानंतर बालकाचे 6 वर्षे पूर्ण झाल्यांनंतर भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नवचैतन्य बालगृह, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे पुढील पुनर्वसन करण्याकरीता बदली करण्यात आली. या बालकाचे पालक किंवा नातेवाईक यांनी बालकास संस्थेत दाखल केल्यापासून ते आजपर्यंत कोणीही भेटावयास आले नाही किंवा कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नाही. यासाठी बालकाचे पालक, नातेवाईक यांनी  अध्यक्ष, सदस्य, बाल कल्याण समिती, कोल्हापूर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, कोल्हापूर, भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, नवचैतन्य बालगृह, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर ९४२३२७२८८४ / ९०११६०७३५० किंवा चाईल्ड लाईन, कोल्हापूर यांचेशी दिलेल्या फोन नंबरवर ९९२३०६८१३५,  ११२ वर ३० दिवसांच्या आत संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.


विविध ठिकाणाहून मिळालेल्या मुलांचे पालक व नातेवाईकांनी संपर्क साधावा