बातम्या

पक्ष, उमेदवार सदस्य, कार्यकर्त्यांसाठी वाहनतळ आणि निकाल पाहण्याची व्यवस्था

Parking and result viewing arrangements for party


By nisha patil - 3/6/2024 6:23:38 AM
Share This News:



लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रमणमाळ येथे दि. ४ जून रोजी होत आहे. ४७ कोल्हापूर अंतर्गत मेरी वेदर मैदान येथे महाविकास आघाडी, काँग्रेस पक्ष, उमेदवार यांच्यासाठी वाहनतळ आणि सदस्य, कार्यकर्त्यांसाठी थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय येथे महायुती शिवसेना-भाजप कार्यकर्ते थांबण्याचे ठिकाण तसेच वाहन पार्किंग व्यवस्था आहे. तर  वंचित बहुजन आघाडी व अपक्ष यांना थांबण्याचे ठिकाण जीएसटी भवन समोरील शाळा लाईन बाजार येथे करण्यात आले आहे. निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वाहन पार्किंग बहुउद्देशीय  हॉल, धोबीघाट समोरील मोकळे मैदान तसेच पोलीस फुटबॉल मैदान येथे करण्यात आले आहे. 

४८ हातकणंगले अंतर्गत महाविकास आघाडी व इतर सहयोगी पक्षासाठी थांबण्याचे ठिकाण युको बँक शेजारी आहे. शिव सेना शिंदे गट, इतर सहयोगी पक्षासाठी पार्किंग व्यवस्था शिवाजी विद्यापीठ समोरील नॅनो सायन्स डिपार्टमेंट येथे करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर पक्ष यांची पार्किंग व्यवस्था नितीन पाटील फार्म हाऊस शेजारील मोकळे मैदान सरनोबतवाडी येथे करण्यात आली आहे. तसेच निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांचे वाहन पार्किंग मतमोजणी केंद्राच्या गेट समोरील मैदानावर केली आहे.


पक्ष, उमेदवार सदस्य, कार्यकर्त्यांसाठी वाहनतळ आणि निकाल पाहण्याची व्यवस्था