बातम्या
रंकाळा टॉवर परिसरात आरक्षित जागेवर पार्किंग सुरू
By nisha patil - 1/30/2025 11:56:58 AM
Share This News:
रंकाळा टॉवर परिसरात आरक्षणाच्या माध्यमातून पार्किंगची जागा महापालिकेच्या ताब्यात आलीय. या जागेवरील पार्किंग आजपासून सुरु करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज दिल्या.
मगील आठवडयात प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी पार्किंग आठ दिवसात सुरु करण्याच्या सूचना इस्टेट ऑफिसर यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सकाळी प्रशासकांनी या पार्किगच्या ठिकाणी आवश्यक ती लाईटची व्यवस्था व गाडया आत येणा-या प्रवेशद्वारजवळ लोखंडी जाळी, पार्किंगचे बोर्ड, पार्किंगचे पट्टे मारले का याची समक्ष जाऊन पाहणी केली.
यावेळी लाईटची मोडतोड केल्याने ते काम लवलकरात लवकर पुर्ण करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. यावेळी पट्टेची इतर कामे पुर्ण झाली असल्याने आजपासून पार्किंग सुरु करण्याच्या सूचना केल्या. या पार्किंगच्या ठिकाणी इस्टेट विभागाचा एक कर्मचारी उपलब्ध ठेवण्यात आला आहे. त्याच्या मार्फत नियमाप्रमाणे तासाला भाडे आकरण्यात येणार आहे.
रंकाळा टॉवर परिसरात आरक्षित जागेवर पार्किंग सुरू
|