बातम्या
विवेकानंदच्या छात्रांचा दिल्ली कॅम्प मध्ये सहभाग
By nisha patil - 9/23/2024 6:59:50 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयातील एनसीसी विभागातील खालील तीन छात्रांची दिल्ली येथील थल सैनिक कॅम्पसाठी निवड झाली होती. यामध्ये ज्युनिअर अंडर ऑफिसर सेला रेगे, बी.एस्सी.बायोटेक भाग 3 हिने हेल्थ ॲण्ड हायजिन व टेंट पिचिंग या इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. सेला रेगे हिला टेंट पिचिंग या इव्हेंटमध्ये सुवर्णपदक मिळाले. तसेच सिनिअर अंडर ऑफिसर चेतन पवार , बी.कॉम.भाग 3 व सार्जण्ट सार्थक कुलकर्णी 12 वी आर्टस याची फायरींग इव्हेंट साठी निवड झाली होती. वरील तीनही छात्र थल सैनिक कॅम्प् दिल्ली यशस्वीरित्या पूर्ण करुन परत आले. याबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य मा. अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी मा.प्राचार्या सौ शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी अभिनंदन केले.
वरील छात्रांना 5 महाराष्ट् बटालियनचे कर्नल मानस दीक्षित, कर्नल सुहास काळे, 6 महाराष्ट्र बटालियनचे कर्नल संधान मिश्रा, कॅप्टन सुनीता भोसले, लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. यावेळी प्रबंधक श्री. रघुनाथ जोग उपस्थित होते.
विवेकानंदच्या छात्रांचा दिल्ली कॅम्प मध्ये सहभाग
|