शैक्षणिक

कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांचे पेटंट

Patent for the production of magnetic nanoparticles for cancer treatment


By nisha patil - 2/4/2025 12:04:29 AM
Share This News:



कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांचे पेटंट

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना कर्करोगावरील ‘हायपरथर्मिया’ उपचारासाठी आवश्यक असलेल्या अ‍ॅमिनेटेड चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट मिळाले आहे.

प्रा. डॉ. विश्वजीत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सतिश फाळके आणि डॉ. अश्विनी साळुंखे यांनी या नॅनो कणांचे संश्लेषण केले. हे कण कर्करोग पेशींशी जोडले जाऊन बाह्य चुंबकीय क्षेत्राद्वारे उष्णता निर्माण करतात, ज्यामुळे कर्करोग पेशी नष्ट होतात.

हे संशोधन कर्करोग उपचारात नवी क्रांती ठरू शकते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी संशोधकांचे अभिनंदन केले आहे.


कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांचे पेटंट
Total Views: 24