बातम्या

डी. वाय. पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते

Patil President Cup Cricket Tournament was inaugurated by


By nisha patil - 1/2/2025 10:53:25 PM
Share This News:



डी. वाय. पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते

कोल्हापूर: डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित "प्रेसिडेंट कप" क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, डीन डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, आणि स्पर्धा संयोजक सदानंद सबनीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सन 2018 पासून डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर आयोजित केली जाते. यावर्षी 24 संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे, आणि अंतिम सामना 18 फेब्रुवारीला होणार आहे. स्पर्धा विद्युत झोतात खेळण्यात येणार आहे.

स्पर्धेची सुरुवात डॉ. संजय डी. पाटील यांच्या नाणेफेकने झाली. यावेळी त्यांनी फलंदाजीचा आनंद घेत, स्पर्धेमुळे कर्मचार्यांमध्ये खिलाडूवृत्ती आणि सांघिक गुण निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली.

स्पर्धेचा सलामी सामना डी. वाय. पाटील हॉस्पिटल आणि डी. वाय. पाटील शुगर फॅक्टरी संघांमध्ये झाला. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, साळोखेनगर स्कूल, कृषी व तंत्र विद्यापीठ, टीम कॉर्पोरेट, नर्सिंग, सिटी मॉल, इंजीनियरिंग बावडा, मेडिकल कॉलेज आणि अन्य अनेक संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

स्पर्धेचे नियोजन बाबुराव वांगळे, बाबू नायक, अमोल उपासे, रावसाहेब पाटील, कुणाल पोवळकर, शंकर गोनूगडे आणि अन्य सहकार्यांद्वारे केले जात आहे.

 


डी. वाय. पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते
Total Views: 55