बातम्या

यशाचे श्रेय घेण्यात पाटील माहीर : राजेखान जमादार

Patil adept at taking credit for success Rajekhan Jamadar


By nisha patil - 4/24/2024 2:44:26 PM
Share This News:



यशाचे  श्रेय घेण्यात पाटील माहीर : राजेखान जमादार 
कोल्हापूरची उमेदवारी सतेज पाटील यांना दिली पण...

मंडलिकांच्या विजय निश्चितीमुळेच सतेज पाटील सैरभैर...

चंदगड येथे महायुतीचे उमेदवार संजय मंडलीक यांची प्रचार सभा झाली या प्रचार सभेत मुरगुड चे माजी  नगराध्यक्ष राजे खान जमादार बोलताना म्हणाले की प्राध्यापक संजय मंडलिक यांचा विजय निश्चित असून आमदार सतेज पाटील त्यामुळे सैरभर झाले आहेत. आणि पातळी सोडून टीका करत आहेत. खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ बोलताना राजे खान जमादार पुढे म्हणाले की अनेक निवडणुकीमध्ये पाटील यांनी खासदार मंडलिक यांची सोबत घेतली त्यामुळे त्यांना विविध संस्थामध्ये यश मिळाले.यशाचे सगळे श्रेय घेण्यात पाटील माहीर आहेत. पाटील हे गृहराज्यमंत्री असताना 2014 साली विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यानंतर जनतेतून निवडून न जाता ते थेट विधान परिषदेवर निवडून गेले. काँग्रेस पक्षनेतृत्वाने कोल्हापूरची उमेदवारी सतेज पाटील यांना दिली होती पण पाटील यांनी उमेदवारीची माळ श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या गळ्यात घातली. असेही ते म्हणाले.


यशाचे श्रेय घेण्यात पाटील माहीर : राजेखान जमादार