बातम्या

पवित्र रिश्ता' मालिकेला पूर्ण झाली तब्बल 14 वर्ष

Pavitra Rishta serial has completed 14 years


By nisha patil - 1/6/2023 6:52:45 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम छोट्या पडद्यावरील 'पवित्र रिश्ता' ही मालिका 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं  मानव ही भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री अंकिता लोखंडेनं अर्चना ही भूमिका साकारली. या मालिकेला 14 वर्ष झाली आहेत. यानिमित्तानं अंकितानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये अंकितानं सुशांतचा उल्लेख केला नाही, त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.
अंकितानं 'पवित्र रिश्ता' या मालिकेचा एक खास व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये अंकिता ही वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. अंकितानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं,पवित्रा रिश्ताची 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. मी अर्चना होऊ शकते, असा माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल एकता कपूरचे आभार. अर्चना म्हणून मला नवीन ओळख दिल्याबद्दल धन्यवाद. मला अजूनही लोक अर्चना नावानेच ओळखतात. मी खूप कृतज्ञ आहे.'


पवित्र रिश्ता' मालिकेला पूर्ण झाली तब्बल 14 वर्ष