बातम्या

बसण्याच्या, झोपण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या

Pay attention to the way you sit and sleep


By nisha patil - 2/27/2024 7:32:35 AM
Share This News:



चुकीच्या पद्धतीने बसणे किंवा झोपणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे कंबरदुखी, पाठदुखीसारख्या समस्या उद्भवतातच. शिवाय इतरही व्याधी होऊ शकतात. त्यामुळे बसण्याच्या आणि झोपण्याच्या पद्धतीकडे नीट लक्ष द्या. चुकीच्या पद्धतीने बसणे, उठणे किंवा झोपणे याचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो.

जेवल्यानंतर नीट बसले नाही तर अन्नपचनाच्या क्रियेवर परिणाम होतो. म्हणूनच जेवल्यानंतर काही वेळ वज्रासनात बसण्याचा सल्ला दिला जातो. जेवल्यानंतर लगेच झोपल्यानेही त्रास होऊ शकतो. चुकीच्या हालचालींमुळे आतड्यांवर ताण येतो. इतकेच नाही, तर बद्धकोष्ठता हा विकार होऊ शकतो. आपल्या शरीराचा सगळा भार पायांवर असतो. त्यामुळे बसण्या-उठण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे गुडघेदुखीसारख्या समस्या निर्माण होतात. पाय दुखू लागतात. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात उंच टाचेची पादत्राणे न घालण्याचा सल्ला दिला जातो. झोपण्याची, बसण्याची चुकीची पद्धत डोकेदुखीला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे पुढच्या वेळी डोकेदुखी उद्भवली तर स्वत:च्या हालचालींचा आढवा घ्या. चुकीच्या शारीरिक स्थितीमुळे स्नायूंवर खूप ताण येतो. मग अंगदुखीच्या तक्रारी सुरू होतात. रात्रीच्या वेळी अंग दुखत असल्याने नीट झोप येत नाही. चुकीच्या पद्धतीने बसल्याने मानसिक आरोग्य बिघडू शकते. शारीरिक तक्रारींमुळे तुम्ही तणावग्रस्त होऊ शकता.


बसण्याच्या, झोपण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या