बातम्या
शेंगदाणे ‘या’ आजारांवर फायदेशीर
By nisha patil - 9/3/2024 7:25:16 AM
Share This News:
सर्वच स्वयंपाक घरात शेंगदाणे आवर्जून वापरले जातात. विविध प्रकारचे पदार्थ बनविताना त्यामध्ये शेंगदाणे वापरले जातात. वांग्याचे भरीत, काही पालेभाज्या, चटणी, लाडू, अशा विविध खाद्यपदार्थांमध्ये गृहिणी शेंगदाणे वापरतात. परंतु, शेंगदाणे देखील काही आजारावर गुणकारी ठरतात हे अनेक लोकांना माहित नाही. शेंगदाण्यात अनेक प्रकारचे नुट्रीएंट्स असतात. या नुट्रीएंट्स मुळे आजारापासून बचाव होण्यास मदत होते. आहारात दररोज मूठभर शेंगदाण्याचा समावेश केल्यास त्याचे अनेक फायदे दिसून येतील.
शेंगदाण्यातील मॅंग्निज रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यास मदत होते. शेंगदाणे रोज खाल्ल्यास ‘मधुमेहा’पासून बचाव होतो. शेंगदाण्यात फायबर्स असतात. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. योग्य प्रमाणात शेंगदाणे खाल्ल्यास ‘बद्धकोष्ठता’ दूर होते. शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर पाण्यातून काढून खा. मात्र, शेंगदाणे हे योग्य प्रमाणातच खाल्ले पाहिजेत. अति प्रमाणात शेंदाण्याचे सेवन केल्यास त्रासही होऊ शकतो. शेंगदाण्यात अँटिऑक्सिडेंट, आयर्न, फोलेट, कॅल्शियम आणि झिंक असते. हे घटक शरीरात कॅन्सरच्या पेशी तयार होण्यापासून वाचवतात. तसेच शेंगदाणे योग्यप्रमाणात सेवन केल्यास ‘हृदया’संबंधीच्या आजारापासून बचावण्यास मदत होते, असे तज्ज्ञ सांगातात.
शेंगदाणे ‘या’ आजारांवर फायदेशीर
|