बातम्या
लोकांमध्ये न्यूनगंड तयार होतोय: पंकजा मुंडे
By nisha patil - 6/17/2024 8:21:38 PM
Share This News:
लोकसभा निवडणुकीतील माझ्या पराभवानंतर निराश झालेले लोक स्वत:चे प्राण देत आहेत. लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने मला सध्या अपराधी वाटत आहे. एरवी मी हिंमतीने लढणारी आहे. मात्र, या सगळ्या गोष्टींमुळे मी सध्या प्रचंड डगमगली आहे, असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. पंकजा मुंडे यांनी सोमवारी अंबाजोगाई तालुक्यातील डीघोळ आंबा येथील पांडुरंग सोनवणे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. बीड लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे त्यांचे कट्टर समर्थक असलेल्या पांडुरंग सोनवणे यांना मोठा धक्का बसला होता. याच नैराश्याच्या भरात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांची पंकजा मुंडे यांनी आज भेट घेतली. यावेळी पंकजा मुंडे भावूक होताना दिसल्या. आत्महत्येसारख्या गोष्टीचं मी समर्थन करणार नाही. मी लोकांना आवाहन करते की, त्यांनी असं काही करु नये. असेही त्या यावेळी म्हणाल्या...
लोकांमध्ये न्यूनगंड तयार होतोय: पंकजा मुंडे
|