बातम्या

बायकोला,मुलांना दाणीला देणाऱ्या मुश्रीफांकडून जनतेचे कल्याण कधीच होणार नाही-स्वाती कोरी यांचा घणाघात

People will never benefit from mushrifs who give charity


By nisha patil - 6/11/2024 6:38:16 PM
Share This News:



बायकोला,मुलांना दाणीला देणाऱ्या मुश्रीफांकडून जनतेचे कल्याण कधीच होणार नाही-स्वाती कोरी यांचा घणाघात

*समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ 
चव्हाणवाडीतील सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद* 

 उत्तूर दि.११ :सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर ईडीने केलेल्या कारवाईत पालकमंत्री हसन मुश्रीफ तुरुंगात जाणार नव्हते.कारण त्या कारखान्याच्या संचालक मंडळात त्यांची बायको व मुले होती.‌ शेतकऱ्यांकडून गोळा केलेल्या शेअर्सच्या पैशात मुश्रीफांनी कोट्यावधींचा गैरव्यवहार केला.या गैरव्यवहारात आपल्या बायकोला व मुलांना दाणीला देणारा माणूस आपण कुठे बघितलेला नाही.बायकोला,मुलांना दाणीला देणाऱ्या अशा मुश्रीफांकडून जनतेचे कल्याण कधीच होणार नाही.अशी घणाघाती टिका  जनता दलाच्या नेत्या सौ.स्वाती कोरी यांनी केली.
         मविआचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ चव्हाणवाडी-उत्तुर (ता.आजरा)येथे आयोजित प्रचार शुभारंभवेळी झालेल्या सभेत त्या बोलत होत्या.
 उत्तुर विभागातील प्रचार शुभारंभ  जागृत देवस्थान श्री जोमकाई देवीची आरती व आशीर्वाद घेऊन केला.
       सौ.कोरी म्हणाल्या," हसन मुश्रीफ पैशाची पोती घेऊन बाहेर पडलेत.जनावरांच्या प्रमाणे ते माणसांचा बाजार करत आहेत. त्यामुळे जनतेने जनावरांप्रमाणे विकायचं की स्वाभिमानाने लढायचं हे ठरवण्याची वेळ आली आहे.स्वाभिमानी समरजीतसिंह घाटगे मुश्रीफांसारख्या हुकुमशाही, राक्षसी प्रवृत्तीच्या विरोधात लढण्यास उभे ठाकलेत.आपण त्यांच्या सोबत राहण्याची गरज आहे.कारण प्रत्येकाच्या मनात परिवर्तनाची आस आहे.मुश्रीफांनी दोन हजार कोटी रुपयांचा गैरव्यहार केला म्हणूनच त्यांच्या मागे ईडी लागली.त्यांनी कोणताच भ्रष्टाचार केला नव्हता अनैतिक मार्गाने पैसे मिळवले नव्हते तर मग ईडीच्या पुढे लोटांगण का घातले? 
 
उमेदवार समरजितसिंह घाटगे म्हणाले,उत्तूर विभागात मुलभूत गोष्टींवर निधी खर्च झाला नाही.आमदार झाल्यावर निधीवर पहिला अधिकार उत्तूर विभागाचा असेल.या विभागात आरोग्य सुविधा देऊ.आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू. 
संपत देसाई आर्दाळकर म्हणाले, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या स्वप्नातील आंबेओहोळ धरणाचे मुळचे तेहतीस कोटी रुपयांचे इस्टिमेट होते.मात्र पालकमंत्र्यांच्या दिरंगाईमुळे अडीचशे कोटीवर हा प्रकल्प गेला. याशिवाय वीस वर्षे हा प्रकल्प रखडल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

 यावेळी गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटीलअॕड.दिग्वीजय कुराडे,एकनाथ देशमुख,संपत देसाई,संजय धुरे,चंद्रकांत गोरुले,प्रकाश कुंभार यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यासपिठावर धोंडीराम सावंत,महादेव मिसाळ,शैलेश मुळीक,भास्कर भाईंगडे,सुजीत कुराडे,योगेश भाईंगडे,शिवाजी गुरव,मारुती हत्तरगी,प्रदीप लोकरे,सुर्यकांत पाटील,धनाजी उत्तूरकर,दीपक चव्हाण,सुखदेव चव्हाण,सतीश शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अभिषेक शिंपी यांनी स्वागत केले.

जोमकाईदेवी मुश्रीफांना बघून घेईल

उद्योगपती प्रकाश चव्हाण म्हणाले,पालकमंत्री मतदारसंघाचा विकास केला म्हणतात. पण त्यांनी भागाच्या विकासापेक्षा बगलबच्चांचा व ठेकेदारांचा विकास केला.जोमकाईदेवीच्या मंदिरसाठीच्या दीड कोटी रुपयांच्या खर्च पडलेल्या निधीतील प्रत्यक्षात सत्तर लाख रुपयांचेच काम झाले आहेत.मुश्रीफ साहेब उर्वरीत निधी कुठे गेला? असा प्रश्न उपस्थित करून मंदिरासाठीच्या निधीतही पैसे खाणाऱ्यांना जोमकाईदेवी पावणार तर नाहीच तर बघून घेईल. 


बायकोला,मुलांना दाणीला देणाऱ्या मुश्रीफांकडून जनतेचे कल्याण कधीच होणार नाही-स्वाती कोरी यांचा घणाघात