बातम्या
लोक कल्याण हेच शिवाजी महाराजांचे अंतिम ध्येय होते: डॉ.केदार फाळके
By nisha patil - 2/6/2023 10:26:45 PM
Share This News:
कोल्हापूर: लोककल्याणासाठी हिंदवी स्वराज्य हे शिवाजी महाराजांचे अंतिम ध्येय होते असे प्रतिपादन शिवचरित्राचे अभ्यासक डॉ. केदार फाळके( पुणे) यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ आणि श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 350 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिरातील आजच्या पहिल्या व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही.एन.शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते .
मा. कुलपती महोदय नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य श्री सिद्धार्थ शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शिवचरित्र :सरंजामशाहीतून स्वातंत्र्याकडे विस्तारित जाणारी क्षितीजे या विषयाच्या अंनुसंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविधंगीकार्याची आणि त्यांच्या दृष्टेपणाची विविध उदाहरणे देत डॉ.फाळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाईया केल्या .त्याहीपेक्षा दुप्पट वेळ त्यांनी लोक कल्याणासाठी घालवला. लोक कल्याणासाठीच त्यांनी 350 वर्षांपूर्वी सार्वभौमत्व सत्तेसाठी राज्याभिषेक करून घेतला. शेती, उद्योग, व्यापार, कर व्यवस्था ,अर्थव्यवस्था या व इतरांगाने त्यांनी विविध सुधारणा केल्या म्हणून शिवाजी महाराजांची तुलना जगातील महान राज्यकर्त्यांच्या मध्ये केली जाते .शिवचरित्रातून आपण चारित्र्यवान धेर्यवान बना असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शाश्वत विकासाचा विचार आपणाला दिला. जलसंवर्धन ,कचरा व्यवस्थापन, वृक्ष संवर्धनाच्या माध्यमातून तो पुढे चालवू या असे आवाहन डॉ. शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
शिवचरित्रातील अनेक घटनांची माहिती श्री सिद्धार्थ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
स्वागत व प्रास्ताविक एन. एस. एस. विभागाचे संचालक डॉ. टी.एम.चौगुले यांनी केले. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के. एम. देसाई यांनी आभार मानले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, प्र.कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील ,श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांचे प्रोत्साहन मिळाले.
शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एनएसएस विभागाचे 200 हून अधिक स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या.
लोक कल्याण हेच शिवाजी महाराजांचे अंतिम ध्येय होते: डॉ.केदार फाळके
|