बातम्या

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नेमा ! - आरोग्य साहाय्य समितीचे महापालिका आयुक्तांना निवेदन

Permanent appointment of Health Officer for Kolhapur Municipal Corporation


By nisha patil - 1/16/2025 8:18:18 PM
Share This News:



 कोल्हापूर महानगरपालिकेसाठी कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नेमा ! - आरोग्य साहाय्य समितीचे महापालिका आयुक्तांना निवेदन 

कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात 2010 पासून कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नसल्याची बाब लक्षात आली आहे. मागील 14 वर्षांपासून आरोग्य अधिकारी हे प्रभारी स्वरूपात काम पाहत आहेत. कोल्हापूर शहराचा सततचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि विविध आरोग्याच्या समस्या पाहता येथे कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या महाराष्ट्र राज्याचे नवे मंत्रिमंडळ स्थापीत झाले आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याचे आमदार प्रकाश आबीटकर यांना आरोग्य मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यांच्या जिल्ह्यात, विशेषतः कोल्हापूर महानगरपालिकेत, इतक्या वर्षांपासून आरोग्य अधिकारी नसणे हे दुर्दैवी आहे आणि ते शहराच्या आरोग्य व्यवस्थेवरही परिणाम करत आहे.

तरी  कोल्हापूर महानगरपालिकेसाठी कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नेमण्यात यावे, या मागणीसाठी आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने कोल्हापूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना निवेदन देण्यात आले.हे निवेदन अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी स्वीकारले. या संदर्भात शासनस्तरावर आमचा पाठपुरावा चालू आहे, असे त्यांनी समितीच्या शिष्टमंडळास सांगितले.

या प्रसंगी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सहसंयोजक अभिजित पाटील, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष राजू तोरस्कर, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख  राजू यादव, एकवीरा मंदिराचे पुजारी  अनिकेत गुरव, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आणि  महेंद्र अहिरे उपस्थित होते. 
 


कोल्हापूर महानगरपालिकेसाठी कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नेमा ! - आरोग्य साहाय्य समितीचे महापालिका आयुक्तांना निवेदन
Total Views: 52