बातम्या

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या पलूस, बोरगाव दोन नवीन शाखेस परवानगी

Permission for two new branches of Kalappanna Awade Ichalkaranji Janata Bank


By nisha patil - 9/18/2023 9:21:24 AM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी सहकारी बँकींग क्षेत्रात अविरतपणे कार्यरत व 44 शाखांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये यशस्वीपणे कार्यरत असलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेस बोरगाव (ता. निपाणी)व पलूस (जि. सांगली) या ठिकाणी नवीन शाखा सुरु करण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली असल्याची माहिती बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी दिली.

ते म्हणाले, बँकेचा पारदर्शी कारभार व अत्याधुनिक बँकींग सेवा देण्यामध्ये नेहमी अग्रेसर असल्यामुळेच बँकेला नवीन दोन शाखा सुरु करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. सभासद, ग्राहक व हितचिंतक यांची बँकेस नेहमीच लाभलेली अतूट साथ यामुळेच बँक दिवसेंदिवस प्रगती करत आहे. पुढील काळातही बँकेची वाटचाल यशस्वी ठेवण्यासह चौफेर प्रगतीसाठी बँक व्यवस्थापन नेहमीच कटिबध्द राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन सीए संजयकुमार अनिगोळ, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन सीए चंद्रकांत चौगुले, सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगांवे, जनरल मॅनेजर किरण पाटील व दिपक पाटील, अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.


कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या पलूस, बोरगाव दोन नवीन शाखेस परवानगी