शैक्षणिक
स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी चिकाटी आणि संयम आवश्यक – प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार
By nisha patil - 2/22/2025 6:15:13 PM
Share This News:
स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी चिकाटी आणि संयम आवश्यक – प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार
कोल्हापूर (दि. २२ फेब्रुवारी) – विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापासून दूर राहून चिकाटी आणि संयमाच्या जोरावर यश मिळवावे, असे मत विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार यांनी व्यक्त केले. स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या कु. क्रांती बेनाडे व कु. तेजश्री गायकवाड यांचा सत्कार त्यांच्या हस्ते संपन्न झाला.
राज्यशास्त्र क्षेत्रात पत्रकारिता, अध्यापन, संशोधन, राजकारण, प्रशासन आणि समाजसेवा अशा विविध संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे प्रा. डी.ए. पवार यांनी मार्गदर्शनपर व्याख्यानात सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या IQAC, व्यवसाय मार्गदर्शन केंद्र आणि राज्यशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. दत्ता जाधव यांनी केले, सूत्रसंचालन कु. सायली वाडकर हिने केले, तर आभार डॉ. अवधूत टिपुगडे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या विविध विभागांतील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी चिकाटी आणि संयम आवश्यक – प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार
|