बातम्या

पन्हाळा उपविभागीय अधिकारी समिर शिंगटे यांची तडकाफडकी बदली

Phanala Samir shingte


By nisha patil - 4/25/2024 4:31:08 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही, उपविभागीय अधिकारी पन्हाळा समिर शिंगटे यांच्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला नाही चुकीचा अहवाल सादर केला सदर माहिती निवडणूक आयोगास दिली नाही हि बाब गंभीर असून याबाबत तात्काळ शुक्रवार दि. २६ एप्रिल पर्यन्त अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल व वन विभागाचे अवर सचिव सुरेश नाईक यांनी आज गुरुवार दि.२५ रोजी सकाळी पुणे विभागीय आयुक्तांना काढले आहेत.
 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पन्हाळा  तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड यांनी पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी समिर शिंगटे यांची निवडणूक कारणास्तव बदली झाली नाही याबाबत राज्यांचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती यानुसार निवडणूक आयोगाने महसूल व वन विभागाचे सचिवांना कार्यकाळ तपासण्याचे आदेश दिले होते सदर आदेश पुणे विभागीय आयुक्तांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना लागू केला होता या अनुषंगाने जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचा दि. २८ मार्च रोजी सादर केलेल्या अहवालात समीर शिंगटे हे बदली पात्र नसल्याचे नमूद केले आहे.
   

मनसे पन्हाळा तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड यानी दुसऱ्यांदा शिंगटे यांच्या बदली प्रकरणी  लक्ष वेधल्यावर आयोगाच्या निदर्शनास आले आहे की काही प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांची त्याच संसदीय मतदारसंघातील लगतच्या जिल्ह्यांमध्ये बदली,नियुक्ती केली जात आहे त्यामुळे आयोगाने असे निर्देश दिले आहेत की, दोन संसदीय मतदारसंघांचा समावेश असलेल्या  सर्व राज्यांनी हे सुनिश्चित करावे की जिल्ह्याबाहेर बदली झालेले अधिकारी त्याच संसदीय मतदारसंघात नियुक्त केले जाणार नाहीत. हे आयोगाच्या सूचनेनुसार आधीच लागू झालेल्या बदल्या, पोस्टिंग साठी देखील लागू होईल.

आयोगाने पुढे निर्देश दिले आहेत की, पूर्वीच्या निर्देशांचे पालन झाल्याचे प्रमाणित करणारा आणि वरील बाबींचा समावेश असलेला अहवाल मुख्य सचिव आणि  राज्याचे पोलीस महासंचालक यांनी शुक्रवार दि. २६ रोजी  दुपारी तीन वाजेपर्यंत आयोगाला सादर करावा असे आदेश निवडणूक आयोगाने  दिले आहेत.
 

मनसे पन्हाळा तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड यांनी दि. ८ एप्रिल रोजी नव्याने दाखल केलेल्या तक्रारीत पन्हाळा उपविभागीय अधिकारी समिर शिंगटे हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यापूर्वी सन दि.१६ सप्टेंबर २०१६ ते दि.७ सप्टेंबर २०१९ या कालावधीमध्ये उप विभागीय अधिकारी, इचलकरंजी या पदावर कार्यरत होते. सन २०१९ मध्ये झालेल्या हातकणंगले लोकसभा मतदार संघात  त्यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पहिले आहे. तसेच समीर शिंगटे हे यापूर्वी दि.८ सप्टेंबर २०१९ ते दि.११ एप्रिल २०२३ या कालावधीत उप विभागीय अधिकारी मिरज, जि. सांगली या पदावर कार्यरत होते. त्यामधील ४० गावे ही ते सध्या कार्यरत असलेले हातकणंगले लोकसभा मतदार संघात येतात. त्यामुळे त्यांची उप विभागीय अधिकारी, पन्हाळा येथे झालेली नेमणूक ही चुकीची असून बेकायदेशीर आहे. हे ही निवडणूक आयोगास कळवलेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे
तसेच ते सध्या याच  हातकणंगले लोकसभा मतदार संघात सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. एकाच मतदार संघात सलग निवडणुकीत त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहता येणार नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाचे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी निवडणूक आयोगास कळवळले नाही. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे नयन गायकवाड यांच्या तक्रारी मधील मुद्यांचा संदर्भ देत अवर सचिव सुरेश नाईक यांनी पुणे विभागीय आयुक्तांना शुक्रवार दि. २६ पर्यन्त अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


पन्हाळा उपविभागीय अधिकारी समिर शिंगटे यांची तडकाफडकी बदली