बातम्या
सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये फार्मा AI IT करिअर कार्यशाळा
By nisha patil - 2/13/2025 6:35:56 PM
Share This News:
कोल्हापुरातील सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी, आणि KITE-Ai Technologies Pvt. Ltd., Pune यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय स्तरावरील फार्मा एआय.आयटी करिअर कार्यशाळेचे भव्य आयोजन करण्यात आलय. अशी माहिती आर. एल. तावडे फाउंडेशन्सच्या सचिव श्रीमती शोभा तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कार्यशाळेचे उद्घाटन उद्या १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता प्रमुख पाहुणे कोफोर्ज कोल्हापूर शाखा उपाध्यक्ष मा. सचिन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांमधून २५० हुन अधिक बी.फार्मसी आणि एम.फार्मसीचे विद्यार्थी सहभागी होत आहेत.
विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल इंडस्ट्रीतील अत्याधुनिक करिअर संधी, क्लिनिकल रिसर्च, मेडिकल कोडिंग, SAS सॉफ्टवेअर, डेटा एनालिटिक्स आणि फार्माकोव्हिजिलन्स यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन मिळणार आहे.
पत्रकार परिषदेला सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसीचे संचालक डॉ.ए.आर.कुलकर्णी,प्राचार्य आर. एस.बगली,समन्वयक भूषण वर्णे उपस्थित होते.
सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये फार्मा AI IT करिअर कार्यशाळा
|