बातम्या

भौतिकशास्त्र अधिविभाग शिक्षणासोबतच अभ्यासेतर उपक्रमामध्ये देखील आघाडीवर: प्रा. आर. जी. सोनकवडे

Physics Sub Department Leading in ExtraCurricular Activities Besides Education Prof R G Sonakwade


By nisha patil - 3/15/2024 12:22:33 PM
Share This News:



कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातर्फे दि. ४ ते ७ मार्च मध्ये शिवस्पंदन वार्षिक क्रीडा महोत्सव २०२३-२४ चे आयोजीत केला होता. सदर महोत्सवामध्ये भौतिकशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ, बॅडमिंटन, क्रिकेट, कबड्डी, रस्सीखेच, मॅरेथॉन, ऍथलेटिक्स या विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. विज्ञान विषयातील असूनसुद्धा बौद्धिक वाढीबरोबर सशक्त शरीर असणे गरजेचे असल्याने विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासोबत सदर स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे आवाहन आणि प्रोत्साहन भौतिकशास्त्र अधिविभागप्रमुख प्रा. आर. जी. सोनकवडे यांच्यामार्फत करण्यात आले. तसेच प्रगतशील विज्ञानासोबत विविध खेळांची सुद्धा नितांत गरज आहे ज्यामुळे भविष्यात ऑलंपिक खेळात देखील आपले कौशल्य सादर करत येईल असे मत प्रा. सोनकवडे यांनी मांडले.  विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत प्राविण्यदेखील मिळविले त्यामध्ये आदिती गुरव (एम. एस्सी. भाग १) या विद्यार्थिनीस 100 मीटर धावणे मध्ये द्वितीय क्रमांक (रौप्य पदक) व उंचउडी मध्ये तृतीय क्रमांक (कांस्य पदक), 400 मी. रीले मध्ये प्रनोती यादव, उत्कर्षा माळी, जयश्री बच्चे, संपदा चव्हाण यांना तृतीय क्रमांक (कांस्य पदक), जयश्री बच्चे (एम. एस्सी. भाग २) लांब उडी मध्ये सुवर्ण पदक, तसेच मिनी मॅरेथॉनमध्ये कर्मचारी गटामध्ये डॉ. एस. एस. पाटील (२ क्रमांक) आणि डॉ. एन. एल. तरवाळ (६ वा क्रमांक). महिला गटामध्ये ऋतुजा पाटील (५ वी क्रमांक) आणि तेजश्री पाटील (६ वी क्रमांक) यांना पारितोषिक मिळाले. तसेच अधिविभागाने सादर केलेल्या विविधतेतून एकता या विषयावरील संचालानास प्रथम क्रमांकाचे (सुवर्णपदक) पारितोषिक मिळाले. सदर संचलनामध्ये सिद्धी पाटील, संपदा चव्हाण, गंगावती सुतार, दिपाली मळगे, तेजश्री पाटील,  प्रणोती यादव, अमृता फराकटे, मयुरी चव्हाण, हर्षदा यादव, अंकिता बागल, साक्षी देशमुख, ऋतुजा पाटील, मोहिनी कांबळे, अवंतिका भोसले, आदिती गुरव, साक्षता वाघमारे, वैष्णवी कुंभार, अक्षता कदम, श्रृती खराडे, प्राची जाधव, सौरभ कुलकर्णी, सिद्धार्थ कदम, पृथ्वीराज घोडके, नितीन म्हमाने, आनंद मासाळ, नरेंद्र दबडे, तुषार सुतार, सुबहान जमादार, श्रेयश शिंदे, राजवर्धन करले या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र अधिविभागप्रमुख प्रा. आर. जी. सोनकवडे, प्रा. डॉ. के. वाय. राजपुरे,  डॉ. आर. एस. व्हटकर, डॉ. एन. एल. तरवाळ, डॉ. एम. व्ही. टाकळे, डॉ. एस. पी. दास, डॉ. यु. एम. चौगुले, डॉ. ए. आर. पाटील, डॉ. व्ही. एस. कुंभार यांचे प्रोत्साहन लाभले. डॉ. एस. एस. पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.


भौतिकशास्त्र अधिविभाग शिक्षणासोबतच अभ्यासेतर उपक्रमामध्ये देखील आघाडीवर: प्रा. आर. जी. सोनकवडे